एच.एस.सी. परीक्षेत टाकळीभानच्या ज्युनिअर कॉलेजचे सुयश.

टाकळीभान : Rayat Shikshan Sanstha संचलित न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील ज्युनिअर कॉलेज, टाकळीभान यांचा मार्च २०२६ मधील एच.एस.सी. परीक्षेचा निकाल समाधानकारक लागला आहे. वाणिज्य शाखेचा ९४.७३ टक्के तर कला शाखेचा ६२.१६ टक्के निकाल लागल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम. शिंदे यांनी दिली.
वाणिज्य शाखेत कु. वैष्णवी दत्तात्रय मुठे हिने ८०.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. दिशा भारत गुंजाळ हिने ८०.१७ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. प्रतिक्षा रोहिदास बिरसणे हिने ७९.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखेत कु. वैष्णवी बापुसाहेब सपकाळ हिने ६९ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. कु. हुमेरा इमाम शेख हिने ६७.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, तर कु. भारती दादासाहेब सावंत हिने ६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे Meenatai Jagdhane, Bapusaheb Patare, मंजाबापू थोरात, राहुल पटारे, मुख्याध्यापक आर. एम. शिंदे, पर्यवेक्षक एस. एस. जरे, प्रा. सुयोग जाधव, प्रा. प्रशांत जुनघरे तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर










