नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात; DCP गिल यांची सकारात्मक भूमिका, ब्राह्मण महासंघ व हिंदू महासभेची पुढाकार
पुणे, दि. २ मे २०२६: भोर तालुक्यातील नसरापूर येथे ३ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारानंतर झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी न्यायप्रक्रियेला वेग देण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याबाबत मा. DCP गिल साहेबांनी सकारात्मक मान्यता दिली आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळण्याच्या आशा बळावल्या आहेत.
आज ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री आनंदजी दवे, प्रदेश समन्वयक श्री उमेशजी कुलकर्णी, पुणे जिल्हाध्यक्ष श्री नितीनजी शुक्ल तसेच सौ. आदिती जोशी आणि निखिल गोरडे यांनी मा. DCP गिल यांची प्रत्यक्ष भेट घेत या गंभीर प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. यावेळी दोषीवर कठोर कारवाईसह खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी करण्यात आली, ज्यास DCP यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
ब्राह्मण महासंघाच्या पुणे महिला अध्यक्षा अॅड. नीता जोशी या पीडित पक्षाच्या वतीने न्यायालयीन लढा लढणार असून, ब्राह्मण महासंघ व हिंदू महासभेकडून स्वतंत्र कायदेशीर मदत देण्यात येणार आहे.
संघटनांच्या प्रतिनिधींनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगितले. नसरापूर प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, आता समाजातील विविध घटक न्यायासाठी एकवटताना दिसत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी










