टाकळीभानचे भूमिपुत्र रमेश तगरे यांना महाराष्ट्र पोलीस पदक

टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान गावचे भूमिपुत्र रमेश सिताराम तगरे, सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे हवालदार म्हणून कार्यरत असून, उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र पोलीस पदक प्रदान करण्यात आले.
कारागृह विभागातील कर्तव्यनिष्ठ व प्रशंसनीय सेवेसाठी आयोजित सन्मान समारंभात राणी भोसले आणि संतोष रहाटे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस सेवेतील कारागृह विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी हा सन्मान देण्यात आला. रमेश तगरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल टाकळीभान ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या सन्मानार्थ लवकरच भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर
Views: 32










