देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावावर.


देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावावर

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : Sunetra Pawar यांनी Baramati पोटनिवडणुकीत तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या फरकाने विजय मिळवत देशाच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील विधानसभा निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या मताधिक्याने मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक विजय मानला जात आहे.

यापूर्वी हा विक्रम Ajit Pawar यांच्या नावावर होता. त्यांनी २०१९ मधील निवडणुकीत १ लाख ६५ हजार २६५ मतांचे मताधिक्य मिळवले होते. त्यानंतर २०२२ मधील Uttar Pradesh विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दोन नेत्यांनी हा विक्रम मोडला होता.

मात्र बारामती पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयासह सुनेत्रा पवार यांनी सर्व जुने विक्रम मागे टाकत हा मान आपल्या नावावर नोंदवला आहे. त्यांच्या या विजयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून बारामतीच्या राजकीय इतिहासातही या निकालाची विशेष नोंद घेतली जात आहे.

प्रतिनिधी:शाम शिरसाठ पुणे .


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!