मुंबईत भरचौकात जीवघेणा हल्ला; डोक्यात घुसलेल्या कोयत्यासह तरुण स्वतः चालत रुग्णालयात पोहोचला
मुंबईत गुन्हेगारीचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात त्याच्या डोक्यात थेट कोयता घुसल्याची खळबळजनक घटना घडली. विशेष म्हणजे, हा तरुण त्याच गंभीर अवस्थेत स्वतः चालत सायन रुग्णालयात दाखल झाला.
गंभीर जखमी असूनही हा तरुण रुग्णालयात अत्यंत शांतपणे मोबाईल वापरताना दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्था आणि रुग्णालय प्रशासनाच्या तत्परतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429
Views: 59










