पुण्यात सुट्ट्या पैशावरून आईस्क्रीम विक्रेत्यासोबत वाद; ढकलून दिल्याने तरुणाचा झाला मृत्यू


​पुण्यात सुट्ट्या पैशावरून आईस्क्रीम विक्रेत्यासोबत वाद; ढकलून दिल्याने तरुणाचा झाला मृत्यू

​इंदापूर तालुक्यातील उध्दट येथे भरलेल्या यात्रेत सुट्ट्या पैशांच्या किरकोळ वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दादा रावण इंगळे असे या मृत तरुणाचे नाव आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, उध्दट येथे सुरू असलेल्या यात्रेदरम्यान दादा इंगळे याचा आईस्क्रीम विक्रेत्याशी वाद झाला. या वादात आरोपी किसन प्रजापतीने दिलेल्या धक्क्यामुळे दादा रस्त्यावर पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
​याप्रकरणी फिर्यादी सुरज हिंमत तुपे यांनी तक्रार दिली आहे. वालचंदनगर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!