कोल्हापुरात ‘गोकुळ’वर अखेर प्रशासक राज; ५ सदस्यीय मंडळाच्या हातात कारभार


कोल्हापुरात ‘गोकुळ’वर अखेर प्रशासक राज; ५ सदस्यीय मंडळाच्या हातात कारभार

​कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्याने अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय प्रशासकीय मंडळाकडे आता गोकुळचा कारभार सोपवण्यात आला आहे.
​विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. गोकुळमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला या निर्णयामुळे तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर नवीन निवडणूक प्रक्रियेपर्यंत हे प्रशासकीय मंडळ कामकाजाची जबाबदारी सांभाळणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!