नागपूरच्या कुहीमध्ये मुरूम माफियांचा महसूल पथकावर हल्ला


नागपूरच्या कुहीमध्ये मुरूम माफियांचा महसूल पथकावर हल्ला

​नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरात अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर मुरूम माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम वाहतूक होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना माफियांनी लक्ष्य केले. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून स्थानिक पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि हल्ल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548428


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!