घणसोलीतील शेतकरी शिक्षण संस्थेच्या विद्यालयाचे १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९८.१८ टक्के निकाल


​घणसोलीतील शेतकरी शिक्षण संस्थेच्या विद्यालयाचे १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९८.१८ टक्के निकाल

​नवी मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने आपले यशाचे सातत्य कायम राखले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९८.१८ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे सर केली आहेत.
​विद्यालयातून कु. सिद्धांत शिवाजी खंदारे याने ९६.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. प्रतीक सुधाकर गायकवाड याने ९३.६० टक्के गुणांसह द्वितीय आणि कु. काव्या ज्ञानेश्वर सोनवणे हिने ९१.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला आहे.
​विद्यालयाच्या निकालाची वैशिष्ट्ये:
विशेष प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी: ५८
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी: १०९
द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी: ८४
​या दैदिप्यमान यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग) तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!