पुण्यात जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाची भरचौकात हत्या; प्रेमसंबंधाच्या वादातून थरार


​पुण्यात जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाची भरचौकात हत्या; प्रेमसंबंधाच्या वादातून थरार

​पुणे:पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाची चाकू आणि चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुभान शेख असे मृत तरुणाचे नाव असून, या हल्ल्यात त्याचा भाऊ अर्शद हा देखील गंभीर जखमी झाला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी सुभानला त्याचे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. मात्र, याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे पर्यावसान हत्येत झाले. विशेष म्हणजे, मृत सुभान हा एका गुन्ह्यात जामिनावर सुटून नुकताच बाहेर आला होता.
​घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!