जालन्यात बूट लपवण्याच्या विधीवरून लग्नात हाणामारी, १४ जणांवर गुन्हे दाखल


​जालन्यात बूट लपवण्याच्या विधीवरून लग्नात हाणामारी, १४ जणांवर गुन्हे दाखल

​जालना:जालन्यातील अंबड तालुक्यात लग्नातील ‘बूट लपवण्याच्या’ विधीवरून नवरदेव आणि नवरीकडील मंडळींमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वादाचे रूपांतर खुर्च्याफेक आणि मारहाणीत झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

​विनोदाने सुरू झालेल्या या विधीचा शेवट मात्र पोलीस ठाण्यात झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी कडक पावले उचलत दोन्ही बाजूंच्या एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शुल्लक कारणावरून झालेल्या या राड्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी

9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!