भारताचे नवीन CDS: लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रामनी यांची मोठी जबाबदारी
नवी दिल्ली: भारत सरकारने देशाचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन.एस. राजा सुब्रामनी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. ३० मे २०२६ रोजी विद्यमान CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सुब्रामनी ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारतील.
सध्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत असलेले सुब्रामनी यांनी याआधी भारतीय लष्कराचे उपप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यांच्याकडे संरक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे, ज्यात सीमेवरील कारवाया, रणनीतिक नियोजन आणि संरक्षण सुधारणा यांचा समावेश आहे. या नियुक्तीमुळे भारताच्या तिन्ही दलांच्या एकात्मिक संरक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पत्रकार: उमेश कुलकर्णी
९८२२५४८४२९










