पुण्याला मिळणार आणखी एक महामार्ग; राज्य सरकारची १२ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, राज्य सरकारने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. नेरळ-शिरूर या नव्या चारपदरी महामार्गाला सरकारने अधिकृत मान्यता दिली असून, यासाठीच्या भूसंपादनाकरिता १२ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
हा नवीन महामार्ग चारपदरी (Four-lane) असेल, ज्यामुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे.
या मार्गामुळे मुंबईहून थेट अहिल्यानगर आणि नाशिकला जाणे अधिक सोपे आणि जलद होईल.
हा प्रकल्प खासगीकरणातून (Privatization) साकारला जाणार आहे.
औद्योगिक क्षेत्राला चालना:
या महामार्गाचा सर्वाधिक फायदा पुण्यातील चाकण, तळेगाव आणि रांजणगाव या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना होणार आहे. मालाची वाहतूक सुलभ झाल्यामुळे या भागातील उद्योगांना मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









