इम्तियाज जलील नाशिकला जाऊन निदा खानला भेटले; मंत्री संजय शिरसाटांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
नाशिक/मुंबई: निदा खान प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत.
काय आहेत मुख्य आरोप?
इम्तियाज जलील यांनी नाशिकमध्ये जाऊन निदा खानची भेट घेतली होती.
जलील यांच्या सांगण्यावरूनच एमआयएमच्या (MIM) एका नगरसेवकाने तिला आश्रय दिला, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
हे प्रकरण केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नसून, यात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचा मोठा कट असल्याचा संशय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
SIT चौकशीची मागणी:
या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, याची एसआयटी (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. “काश्मीर फाईल्स” चित्रपटाप्रमाणेच ही परिस्थिती घडत असल्याचे विधान करत त्यांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सूचित केले आहे.
या आरोपांमुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









