भाजपमध्ये पक्ष संघटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही – ॲड. भरतजी पाटील


​भाजपमध्ये पक्ष संघटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही – ॲड. भरतजी पाटील

​पिंपरी-चिंचवड:राजकारणात काम करत असताना पक्ष संघटना ही नेहमी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी असते. प्रत्येक कार्यकर्त्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की, भाजपमध्ये पक्ष संघटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही,” असे प्रतिपादन ॲड. श्री भरतजी पाटील यांनी केले.
​पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या मोरवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित शहर पक्ष संघटन बैठकीत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​संघटनेचे महत्त्व अधोरेखित:
यावेळी बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले की, शिस्त आणि संघटनात्मक बांधणी हीच भारतीय जनता पार्टीची खरी ताकद आहे. कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
​या बैठकीत आगामी काळातील पक्षाची रणनीती आणि संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला. मोरवाडी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!