अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वुशू स्पर्धेत महाराष्ट्राच्या जिया मुजावरची दमदार कामगिरी; रौप्य पदक पटकावले


अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वुशू स्पर्धेत महाराष्ट्राच्या जिया मुजावरची दमदार कामगिरी; रौप्य पदक पटकावले

श्रीनगर: महाराष्ट्रातील पूणे थेरगाव येथील उदयोन्मुख वुशूपटू जिया मुजावर हिने श्रीनगर येथे पार पडलेल्या ‘अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वुशू (पुरुष व महिला) चॅम्पियनशिप २०२६’मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली. ४ ते ९ मे २०२६ दरम्यान झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची सांगता ९ मे रोजी झाली.
काश्मीर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालनालयाच्या वतीने, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील तब्बल १९५ विद्यापीठांमधील १५०० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामुळे भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी आंतरविद्यापीठ वुशू स्पर्धा ठरली.
‘सिनियर महिला सांडा’ ४५ किलो वजनी गटात जियाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट ताकद, चपळता आणि मानसिक कणखरतेचे दर्शन घडवले. उपांत्य फेरीपर्यंत शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत तिने धडक मारली. अंतिम सामन्यात तिची लढत लुधियाना विद्यापीठाच्या खेळाडूशी झाली. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात जियाने पराक्रमी खेळ करत महाराष्ट्रासाठी रौप्य पदक निश्चित केले.
जियाच्या या यशामागे तिचा कठोर सराव, अथक मेहनत आणि जिद्द महत्त्वाची ठरली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असून, विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जियाच्या यशाने राज्यातील युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!