बनावट पोलीस बनून तरुणीवर पाच महिने अत्याचार; शिर्डी, नाशिकसह ३ ठिकाणी नराधमाचे कृत्य
नाशिक:कॉलेजचे हरवलेले ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने मैत्री करून, स्वतः पोलीस असल्याचे भासवून एका तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप बेंडके असे आरोपीचे नाव आहे. त्याने पीडित तरुणीशी मैत्री केली आणि आपण पोलीस दलात कार्यरत असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर त्याने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी त्याने गेल्या ५ महिन्यात पीडितेवर नांदगाव, शिर्डी आणि नाशिक रोड येथील विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला.
या गंभीर प्रकारानंतर पीडित तरुणीने हिंमत एकवटून नांदगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून संबंधित हॉटेलची तपासणी करत पंचनामा केला आहे. सध्या आरोपी संदीप बेंडके फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
खोटे आयडी कार्ड किंवा पोलीस असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429




