पोलिसांना हक्काचे घर! फडणवीसांकडून १७६८ कोटींच्या आगाऊ निधीला मंजुरी
मुंबई: राज्यातील पोलीस दलासाठी मोठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या घरबांधणीसाठी तब्बल १७६८.०८ कोटी रुपयांच्या अग्रिम निधीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे ५४५९ पोलिस कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार असून, त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होईल.
फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून ही घोषणा केली. “पोलीस बांधवांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे,” असे त्यांनी नमूद केले. कर्तव्यावर असताना घराची चिंता मिटवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस दलातून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. गृह विभागाकडून निधी वितरणाची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार असल्याची माहिती मिळाली. या योजनेद्वारे पोलिसांच्या निवासस्थान समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









