वारंवार पेपरफुटीला आळा कधी? सरकारने कठोर कायदा करून कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची जनतेची मागणी
दहावी-बारावीपासून ते NEET, स्पर्धा परीक्षा आणि विविध भरती प्रक्रियांपर्यंत देशातील अनेक महत्त्वाच्या परीक्षांमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना समोर येत असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अक्षरशः धोक्यात आले आहे. वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर काही भ्रष्ट प्रवृत्ती पाणी फेरत असल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रत्येक वर्षी तीच समस्या; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
राज्य मंडळ, भरती परीक्षा, वैद्यकीय प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा अशा अनेक स्तरांवर पेपरफुटीच्या घटना उघड होत आहेत. यामुळे मेहनती विद्यार्थ्यांचे नुकसान, पालकांवर आर्थिक ताण आणि संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. “अभ्यास करणाऱ्यांनीच शिक्षा भोगायची का?” असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारत आहेत.
कायमस्वरूपी कठोर कायद्याची गरज
फक्त चौकशी किंवा तात्पुरती कारवाई न करता पेपरफुटीला राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यासारखे गांभीर्य देऊन कठोर आणि कायमस्वरूपी कायदा करण्याची मागणी जोर धरत आहे.
जनतेच्या प्रमुख मागण्या:
पेपरफुटी प्रकरणांसाठी कठोर विशेष कायदा
दोषींना आजीवन कारावास किंवा कठोर शिक्षा
परीक्षा प्रक्रियेत डिजिटल सुरक्षा आणि एन्क्रिप्टेड प्रणाली
परीक्षा केंद्रांवर स्वतंत्र देखरेख यंत्रणा
आर्थिक व्यवहारांची विशेष चौकशी
दोषी अधिकाऱ्यांवरही थेट कारवाई
विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवणे गरजेचे
शिक्षण आणि भरती व्यवस्था ही देशाच्या भविष्याचा पाया आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांना फक्त राजकीय मुद्दा न बनवता, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
जनतेचा सवाल
“प्रत्येक वेळी पेपर फुटल्यानंतरच सरकार जागे होणार का, की आता कायमचा बंदोबस्त करणार?”
पत्रकार: उमेश कुलकर्णी
9822548429









