क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवडचा देशभर नावलौकिक व्हावा – खासदार श्रीरंग बारणे.


क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवडचा देशभर नावलौकिक व्हावा – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:  पिंपरी चिंचवड ही नगरी कबड्डी खेळाची पंढरी असून येथून अधिकाधिक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत आणि क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव देशभरात नावलौकिक मिळवावे, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
भोसरी येथील गावजत्रा मैदानावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६ ला खासदार बारणे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
प्रो कबड्डी स्पर्धेमुळे खेळाडूंना मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असून भविष्यात अधिकाधिक खेळाडूंनी या क्षेत्रात यश संपादन करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
महापौर रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य तथा शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य निलेश तरस, नगरसदस्या सुलभा उबाळे, उपायुक्त पंकज पाटील, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे व अरुण कडूस यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी : शाम शिरसाठ, पुणे.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!