धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

टाकळीभान : “हिंदू धर्म हा धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानामुळे टिकून राहिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन ह.भ.प. विश्वनाथ गिरी महाराज यांनी केले.
टाकळीभान बसस्थानक परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विश्वनाथ गिरी महाराज बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. विश्वनाथ गिरीजी महाराज व ह.भ.प. कृष्ण महाराज वाघुले यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराजांची आरती संपन्न झाली.
सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच बाल वारकरी विद्यार्थी, टाळकरी भजनी मंडळी यांच्या सहभागातून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी” आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या प्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार, सोसायटीचे चेअरमन मंजाबापू थोरात, कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, राहुल पटारे, विलास दाभाडे, प्राचार्य जयकर मगर, ॲड. प्रमोद वलटे, आबासाहेब रणनवरे, बंडोपंत बोडखे, अनिल बोडखे, अक्षय कोकणे, संभाजी पटारे, रणजीत मगर, बापूसाहेब शिंदे, सुधीर मगर, मेजर राहुल तांदळे, नरेंद्र अबुज, किशोर माने, प्रताप परदेशी, विक्रांत माने, केतन शिंदे, संदीप कोकणे, विलास बोडखे, मनोज मगर, गौरव चितळे, बबलू परदेशी आदींसह छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठान, राजमुद्रा ग्रुपचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर






