हडपसरच्या रुग्णालयात बॉम्ब सदृश वस्तूमुळे खळबळ; नागपूरमधून आरोपी जेरबंद


हडपसरच्या रुग्णालयात बॉम्ब सदृश वस्तूमुळे खळबळ; नागपूरमधून आरोपी जेरबंद

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील उषाकिरण मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली. रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात संशयास्पद वस्तू सापडल्यानंतर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. वस्तूमध्ये चार नळकांड्या, लाल-काळ्या वायर आणि डिजिटल टायमर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत काळजीपूर्वक ही वस्तू निकामी करण्यात आली. यानंतर पोलिस आणि एटीएसने संयुक्त तपास सुरू करत आरोपीचा माग काढला.
तपासादरम्यान शिवाजी राम चोरगावे उर्फ शिवाजी राम राठोड (वय २९) याची ओळख पटली असून, त्याला नागपूरमधून अटक करण्यात आली. आरोपीने उपचाराच्या निमित्ताने रुग्णालयात भेट दिल्यानंतर ही बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार दहशतवादी कारवाई नसून खंडणी उकळणे आणि दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने रचलेला कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस आरोपीच्या मानसिक स्थिती, हेतू आणि संभाव्य साथीदारांचा तपास करत आहेत.
या घटनेनंतर रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आल्या आहेत. पोलिस आणि एटीएसकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!