भोकरदन तालुका अध्यक्षपदी महेंद्र बेराड यांची नियुक्ती
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून नियुक्ती पत्र प्रदान

पारध | प्रतिनिधी
सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठविणारे महेंद्र बेराड यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या भोकरदन तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेकडून 12 मे 2026 रोजी त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
हे नियुक्ती पत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल दादा देसले यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले. या नियुक्तीबद्दल श्री. मुरलीधर डहाके, माहोरा प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव देशमुख (जालना) आणि जालना जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ उंबरकर यांनी महेंद्र बेराड यांचे विशेष अभिनंदन केले.
नियुक्तीनंतर पारध परिसरात महेंद्र बेराड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सामाजिक व जनहिताच्या क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नियुक्ती पत्रानुसार, भोकरदन तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या संघटनेच्या माध्यमातून सोडविणे, भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करणे, नागरिकांच्या अडचणी शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि सामाजिक न्यायासाठी कार्य करणे, ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
महेंद्र बेराड यांनी यापूर्वीही सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध विषयांवर सक्रियपणे काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भोकरदन तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल विविध सामाजिक संघटना, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पत्रकार उनेश कुलकर्णी
9822548429









