जत शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा उच्छाद;नागरिकांमध्ये तीव्र संताप


जत शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा उच्छाद;नागरिकांमध्ये तीव्र संताप

जत (प्रतिनिधी) : जत शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.यामुळे सामान्य नागरिक,महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून,नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील बसस्थानक परिसर,मुख्य चौक,मोकळी मैदाने,सार्वजनिक बागा आणि काही निवासी भागांच्या आसपास रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर गोंधळ घालणे आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करणे.रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना विनाकारण त्रास देणे.मद्यपान करून रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा रस्त्याच्या कडेला फेकून देणे.रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हुल्लडबाजीमुळे परिसरातील शांतता भंग होणे.शाळा,महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यालयांच्या परिसरात हे प्रकार घडत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे महिला आणि युवतींमध्ये कमालीची असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.मात्र, अद्याप कोणतीही ठोस किंवा प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कडक कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

प्रतिनिधी : संजय कोळी.
७८७५९०३७७७.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!