तालुका बांधकाम कामगार सनियंत्रण समितीच्या सदस्यपदी गणेश छल्लारे

टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुका बांधकाम कामगार सनियंत्रण समितीच्या सदस्यपदी किशोर उर्फ गणेश छल्लारे यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीबद्दल विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण दादा ससाणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मंजुश्रीताई मुरकुटे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले, उपनगराध्यक्ष कांचनताई सानप आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी गणेश छल्लारे यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
गणेश छल्लारे हे बांधकाम कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असून विविध शासकीय योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते तत्परतेने काम करत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
माजी आमदार भानुदास मुरकुटे तसेच अशोक कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश छल्लारे हे विविध सामाजिक उपक्रम आणि समाजोपयोगी कामांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर









