राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जय पवारांकडे ३ महत्त्वाची पदे; वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता, सुनील तटकरेंचे नाव यादीतून गायब?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या नव्या रचनेत जय पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याने पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे नवीन फेररचना?
या नव्या रचनेत जय पवार यांच्याकडे एकाच वेळी ३ महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत:
१. राष्ट्रीय सचिव
२. राष्ट्रीय खजिनदार
३. शिस्तभंग समिती अध्यक्ष
सुनील तटकरेंचे नाव गायब असल्याने संभ्रम
विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या या यादीतून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे नाव गायब असल्याचे समोर आले आहे. यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, ही पदे केवळ तात्पुरत्या स्वरूपाची असून त्यात लवकरच बदल करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही या नवीन निवडीमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










