​भररस्त्यात तरुणीने थोबाडीत मारल्याने अपमान सहन न होऊन तरुणाची आत्महत्या


​भररस्त्यात तरुणीने थोबाडीत मारल्याने अपमान सहन न होऊन तरुणाची आत्महत्या

बीडमधील धक्कादायक घटना
​बीड जिल्हयातील मोहा गावात एका २२ वर्षीय तरुणाने सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अपमानामुळे आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रहार राजेभाऊ शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे. १३ मे रोजी गावातीलच एका तरुणीने त्याला भररस्त्यात सर्वांसमक्ष थोबाडीत मारली होती. या सार्वजनिक अपमानामुळे चंद्रहार प्रचंड मानसिक तणावाखाली होता.

अपमान सहन न झाल्याने दुसऱ्या दिवशी चंद्रहारने आपल्या वडिलांना फोन केला. “हा माझा शेवटचा फोन आहे,” असे सांगून त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
​याप्रकरणी सिरसाळा पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!