कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी


कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी

​कोकण रेल्वेमार्गावर १० अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार
​मुंबई-पुणे आणि कोकण पट्ट्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेमार्गावर १० अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
​या विशेष गाड्यांमुळे मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला असून, यामुळे प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!