कोल्हापुरात जावयासाठी बनवली ४ लाखांची ‘चांदीची चप्पल’; सोशल मीडियावर अनोख्या भेटीची चर्चा


कोल्हापुरात जावयासाठी बनवली ४ लाखांची ‘चांदीची चप्पल’; सोशल मीडियावर अनोख्या भेटीची चर्चा

​कोल्हापूर: आपल्या कलेसाठी आणि रांगड्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात एका सासऱ्याने आपल्या जावयाला दिलेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘धोंड्याच्या महिन्यात’ जावयाला खास भेट देण्याच्या परंपरेला श्रीमंती झालर जोडत, एका वधूपित्याने आपल्या जावयासाठी तब्बल ४ लाख रुपये किमतीची ‘चांदीची चप्पल’ बनवून घेतली आहे.
​दीड किलो चांदी आणि कारागिरांची मेहनत
ही चप्पल हुबेहूब चामड्याच्या कोल्हापुरी चपलेसारखी दिसत असून ती बनवण्यासाठी सुमारे दीड किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या कुशल कारागिरांनी सलग ८ दिवस मेहनत घेऊन ही कलाकृती साकारली आहे. या चप्पलची किंमत ४ लाख रुपये असून, ती घडवण्यासाठी २२ हजार रुपये मजुरी देण्यात आली आहे.
​परंपरेला लाभली श्रीमंतीची जोड
हिंदू संस्कृतीत धोंड्याच्या महिन्यात जावयाला वाण किंवा भेटवस्तू देण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, कोल्हापुरातील या वधूपित्याने ही परंपरा अत्यंत अनोख्या आणि भव्य पद्धतीने साजरी केल्याने सध्या सर्वत्र या ‘चांदीच्या चपले’ची आणि जावयाला मिळालेल्या शाही भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही या चपलेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पत्रकार उमेश कुलकर्णी


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!