​सातारा: महेंद्र गायकवाड ठरला ५२ वा ‘हिंद केसरी’; अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळचा पराभव


​सातारा: महेंद्र गायकवाड ठरला ५२ वा ‘हिंद केसरी’; अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळचा पराभव

​सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगलेल्या ५२ व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार नुकताच पार पडला. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने आपले वर्चस्व सिद्ध करत ‘हिंद केसरी’चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात महेंद्रने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळवर अवघ्या १८ सेकंदात २-० अशा गुणांनी मात केली.
​या विजयामुळे महेंद्र गायकवाडला मानाची ‘हिंदकेसरी गदा’ आणि ‘महिंद्रा थार’ गाडी बक्षीस म्हणून मिळाली आहे. तर उपविजेता ठरलेल्या पृथ्वीराज मोहोळला ट्रॅक्टर देऊन गौरविण्यात आले.
​दुर्दैवी दुखापत आणि वाद
अंतिम लढतीदरम्यान महेंद्रने डाव टाकला असता पृथ्वीराजचा हात पिळला गेला, ज्यामुळे त्याचा हात मोडला. या दुखापतीमुळे सामन्याला वेगळे वळण लागले. तसेच, आखाड्यात पराभव झाल्यानंतर पृथ्वीराजने महेंद्रला उघडपणे धमकी दिल्याची चर्चा रंगली आहे. ‘आज हरलो पण.. तुला संपवणार…’ अशा आशयाचे विधान पृथ्वीराजने केल्याचे बोलले जात असून, या प्रकारामुळे कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!