खेड तालुक्याचा राज्यस्तरीय गौरव; “महा-आवास अभियान” अंतर्गत दुहेरी सन्मान
सातारा : दिनांक 15 मे 2026 रोजी सैनिक स्कूल, सातारा जिल्हा सातारा येथे “ग्रामविकास विभाग व पंचायतराज अभियान महाराष्ट्र शासन” अंतर्गत “महा-आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार” समारंभ उत्साहात पार पडला. राज्यभरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा व अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात मा. श्री. जयकुमार गोरे, मंत्री ग्रामविकास व पंचायत राज महाराष्ट्र शासन, मा. श्री. एकनाथ डवले, प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य, मा. डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, विभागीय आयुक्त पुणे विभाग तसेच मा. डॉ. राजाराम दिघे, संचालक ग्रामीण गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
महा आवास अभियान सन 2023-24 अंतर्गत राज्यस्तरावर “सर्वोत्कृष्ट गृह संकुलन” या विभागात आसखेड खुर्द ता. खेड यास प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच खेड तालुक्यास “सर्वोत्कृष्ट तालुका” म्हणून द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री. सुनिल रामचंद्र भोईर, गटविकास अधिकारी खेड यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. खेड तालुक्याच्या या यशामुळे तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामविकास विभागाच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेली आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






