राष्ट्रवादीत मोठी घडामोडी! प्रशांत किशोर आता अजित पवार गटाचे नवे रणनीतीकार


​राष्ट्रवादीत मोठी घडामोडी! प्रशांत किशोर आता अजित पवार गटाचे नवे रणनीतीकार

​मुंबई:राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठी खेळी खेळली असून, प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पक्षाचे नवे रणनीतीकार म्हणून नियुक्ती केली आहे. ‘डिझाईन बॉक्स’नंतर आता प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षाच्या रणनीतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची प्रशांत किशोर यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. १ जूनपासून प्रशांत किशोर यांची कंपनी आगामी निवडणुकांसाठी पक्षाचे काम अधिकृतपणे सुरू करणार आहे.
​लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच प्रशांत किशोर यांच्यासारख्या अनुभवी रणनीतीकाराची साथ मिळाल्याने अजित पवार गटाला आगामी काळात किती फायदा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
​पत्रकार उमेश कुलकर्णी


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!