​जळगावात वादळी वाऱ्याचा थरार! मंडपाच्या खांबासह वऱ्हाडी हवेत लटकले, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल


​जळगावात वादळी वाऱ्याचा थरार! मंडपाच्या खांबासह वऱ्हाडी हवेत लटकले, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

​जळगाव:जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील परसाळे गावातून एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण लग्नाचा मंडप हवेत उडू लागला. हा उडणारा मंडप सावरण्याच्या नादात काही तरुण चक्क खांबाला लटकून हवेत उडाल्याचे पाहायला मिळाले.
​परसाळे गावात हळदीचा समारंभ उत्साहात सुरू होता. मात्र, अचानक वातावरणात बदल झाला आणि वेगवान वारे वाहू लागले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, मोठा मंडप उखडून हवेत उडू लागला. हा मंडप वाचवण्यासाठी गावातील काही धाडसी तरुणांनी धाव घेतली आणि मंडपाचे खांब पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्याचा जोर जास्त असल्याने हे तरुण खांबासह थेट हवेत लटकेले गेले.
​या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुदैवाने, या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अचानक आलेल्या या संकटामुळे काही काळ लग्नाच्या ठिकाणी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

​पत्रकार : उमेश कुलकर्णी
9822548429


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!