पुणे रेल्वे स्टेशनवर लॅपटॉप चोरणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ४० हजारांचा मुद्देमाल जप्त


पुणे रेल्वे स्टेशनवर लॅपटॉप चोरणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

​पुणे: पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशाचा लॅपटॉप चोरणाऱ्या अट्टल चोराला पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. सुनील किसन गुजराती (वय ३०, रा. काळुबाई मंदिर मागे, वडार गल्ली, दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी शिवम सैनी (वय २३, रा. हरियाणा) हे प्लॅटफॉर्म क्रमांक १/७ वर दर्शन एक्सप्रेसची वाट पाहत थांबले होते. यावेळी त्यांच्या जवळील ४० हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा ग्रे रंगाचा लॅपटॉप (सिरीयल नंबर ५ सीडी ४३४ एफ ९७२) गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २३५/२०२६) दाखल करण्यात आला होता.

१८ मे २०२६ रोजी पुणे लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफचे पथक गस्त घालत असताना संशयित सुनील गुजराती पोलिसांना मिळून आला. सीसीटीव्ही फुटेजची खात्री पटल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून चोरलेला लॅपटॉप विकण्यासाठी तो पुन्हा स्टेशनवर आला होता. पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा तोच लॅपटॉप हस्तगत केला आहे.

ही यशस्वी कारवाई पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पी आय खोपीकर, चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली,तपास पथक पीएसआय यशवंत साळुंके, पीएसआय शंभू रणवरे, पो. हवा.सतीश खराडे, अमरदीप साळुंके ,पो. हवा. कचरे, पो. हवा. भोसले,चालक काळे आणि आरपीएफ स्टाफ यांनी सहकार्य केले,असून, आरोपीला १४ दिवस न्यायालयीन कोठडी मिळावी यासाठी माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, लोहमार्ग न्यायालय, पुणे यांच्याकडे सविनय सादर करण्यात आले आहे.

पत्रकार :उमेश कुलकर्णी

9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!