​पुनावळे गोळीबार प्रकरण: आरजू बिश्नोई टोळीच्या ३ शूटर्सना हरिद्वारमध्ये बेड्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई


​पुनावळे गोळीबार प्रकरण: आरजू बिश्नोई टोळीच्या ३ शूटर्सना हरिद्वारमध्ये बेड्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

​पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुनावळे येथील ‘एजे फर्निचर मॉल’वर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. या गोळीबारातील मुख्य आरोपी आणि आरजू बिश्नोई टोळीच्या ३ शूटर्सना पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली आहे.
​प्रवीण राम निवास, पंकज राठी आणि सागर पाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मॉलचे भागीदार अशोक नैन यांच्याकडून २ कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात २ पिस्तुलांतून ५-६ राउंड गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
​तपासातील महत्त्वाचे मुद्दे:
​ही टोळी आरजू बिश्नोईची असून तिचा लॉरेन्स बिश्नोईशी थेट संबंध नाही.
​लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून दहशत निर्माण करण्यासाठी ही टोळी कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
​आरोपींना पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष पथक तैनात केले होते.
​या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.
​पत्रकार : उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!