टेस्लाचा मोठा निर्णय; भारतातील फॅक्टरी उभारणीची योजना गुंडाळली


टेस्लाचा मोठा निर्णय; भारतातील फॅक्टरी उभारणीची योजना गुंडाळली

​जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली इलॉन मस्क यांची ‘टेस्ला’ कंपनी भारतात आपली ईव्ही (EV) मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी सुरू करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र, आता समोर आलेल्या ‘टेसलाराती’ (Teslarati) च्या रिपोर्टनुसार, टेस्लाने भारतातील कारखाना उभारणीची योजना तूर्तास गुंडाळली आहे.
​भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील टॅरिफ ११०% वरून १५% पर्यंत कमी करण्यासाठी टेस्लासमोर एक महत्त्वाची अट ठेवली होती. या अटीनुसार, सवलत मिळण्यापूर्वी टेस्लाने भारतात स्थानिक कारखाना उभारणे आवश्यक होते. परंतु, टेस्ला कंपनी या अटीसाठी तयार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!