पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकले; आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची भररस्त्यात निर्घृण हत्या


​पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकले; आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची भररस्त्यात निर्घृण हत्या

​पुण्यातील बालाजीनगर बस स्टँड परिसरात मंगळवारी रात्री उशिरा टोळीयुद्धाच्या वादातून अक्षय उर्फ बाळा म्हस्के या युवकाची हत्या करण्यात आली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी म्हस्के याचा अक्षय हा सख्खा भाऊ होता. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धाच्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १२ जणांच्या टोळक्याने अक्षयवर आधी गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!