धक्कादायक: अमरावतीच्या विवाहितेची नागपुरात गळा आवळून हत्या; दफन केलेला मृतदेह बाहेर काढताच हत्येचा पर्दाफाश
नागपूरमध्ये सासरी मृत्यू झालेल्या अमरावतीच्या १९ वर्षीय फाजीला जुबेर हिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. सासरच्या मंडळींनी फाजीलाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा बनाव रचला होता, मात्र संशयास्पद परिस्थितीमुळे १७ मे रोजी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह कबरीतून बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले.
या धक्कादायक प्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी फाजीलाचा पती, दीर आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी फाजीलाचा दीर तिच्यावर वाईट नजर ठेवत असल्याची माहिती तिने आपल्या भावाला दिली होती, अशीही धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
9822548429










