सांगली द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाची टांगती तलवार :-


सांगली द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाची टांगती तलवार :-

सांगली :दि. 21 मे :-चीनमधील निकृष्ट दर्जाचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे आयात शुल्क चुकवून भारतात आणला जात असून, त्यापैकी तब्बल २०० टन बेदाणा सांगलीत दाखल झाल्याचा गंभीर आरोप द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभाग उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली.

चीनच्या बेदाण्यात भारतीय बेदाण्याची भेसळ करून विक्री केली जात असल्याने स्थानिक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचा बेदाणा येत राहिला, तर महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडतील,” असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!