भाजप मधील गटबाजी मुळे सांगली महापालिका बजेट लटकले :
सांगली दि. 21 मे :-सांगली महानगरपालिकेचे बजेट अद्याप सादर न झाल्याने विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांत बजेट सादर न झाल्यास “प्रति महासभा” घेऊन तेच बजेट मंजूर करण्याचा इशारा त्यांनी दिला.
भाजपमधील गटबाजीमुळेच बजेट रखडल्याचा आरोप करत, पावसाळ्यापूर्वी कामांवर याचा परिणाम होणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
सत्ताधारी पक्ष आता काय भूमिका घेणार यांच्याकडे संपूर्ण जिल्हाचे लक्ष लागून राहिले आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.
Views: 109










