तीन रुपये कांद्याला भाव; शेतकरी संघटनेचे आंदोलन

टाकळीभान प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीरामपूर येथे कांद्याला अवघा तीन रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजितदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
कांद्याच्या दरात तातडीने वाढ करावी, शेतकऱ्यांना न्याय्य भाव मिळावा, या मागण्यांसाठी आंदोलकांनी बाजार समिती प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी बाजार समितीच्या सचिवांनाही जाब विचारण्यात आला.
आंदोलनात युवा तालुका अध्यक्ष शरदभाऊ असने, शेतकरी संपर्कप्रमुख साहेबराव चोरमले, सचिन वेताळ, कापसे भाऊसाहेब, घोडे भाऊसाहेब, सुजित बोडखे, बाबासाहेब वेताळ, भाऊसाहेब गव्हाणे, ज्ञानदेव नारायण, संतोष मुठे, बापूसाहेब गोरे, कैलास भणगे, शिंदे पाटील, शिवाजी पटारे, राहुल निघोट आदी उपस्थित होते.
पत्रकार: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.










