भोसरीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका
अचानक आलेल्या पावसाने उडवली नागरिकांची धांदल
भोसरी परिसरात आज दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. काही वेळातच वातावरणात मोठा बदल झाल्याने रस्त्यांवर धावपळ सुरू झाली.
जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या असून काही भागांमध्ये वाहतुकीवरही परिणाम झाला. अचानक आलेल्या पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. दुचाकीस्वारांनी आसरा घेण्यासाठी दुकाने आणि इमारतींच्या परिसरात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचीही माहिती समोर येत आहे. वादळी वाऱ्यामुळे फलक, पत्रे तसेच हलकी साहित्य उडून गेल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना सतर्क राहावे लागत आहे.
विजय अडसूळ










