कर्वेनगरमध्ये ब्राह्मण संस्थांच्या नावाने पैसे मागणाऱ्या संशयिताविरोधात पोलिसांत निवेदन
कर्वेनगर परिसरात ब्राह्मण संस्थांच्या नावाने नागरिकांकडे पैसे मागत फिरणाऱ्या संशयित व्यक्तीविरोधात आज महाराष्ट्र ब्राह्मण सभा यांच्या वतीने अलंकार पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
हे निवेदन क्राईम विभागाच्या पीआय स्मिता पाटील तसेच पीएसआय जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे सांगितले. तसेच संशयिताचा शोध घेण्यासाठी परिसरातील बीट मार्शलची गस्त आणि संख्या वाढवण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
महाराष्ट्र ब्राह्मण सभा यांनी स्पष्ट केले की, कोणतीही अधिकृत ब्राह्मण संस्था घरोघरी जाऊन देणगी किंवा वर्गणी मागत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अतुल व्यास, प्रदेशाध्यक्ष मयुरेश अरगडे, प्रदेश कार्याध्यक्ष चैतन्य जोशी, जिल्हाध्यक्ष पल्लवी गाडगीळ, जिल्हा उपाध्यक्ष निनाद जोशी, जिल्हा उपाध्यक्ष रुपाली जोशी तसेच शहर संघटक आदित्य काळे उपस्थित होते.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429







