कॉक्रोच जनता पार्टी’ला प्रकाश आंबेडकर आणि अण्णा हजारेंचा पाठिंबा
सरन्यायाधीशांच्या ‘कॉक्रोच’ विधानाचा निषेध करण्यासाठी अभिजित दिपके यांनी स्थापन केलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिपके यांच्या कुटुंबाला धीर देत, सरन्यायाधीशांनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
दुसरीकडे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील या मोहिमेची दखल घेतली आहे. ‘युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती’ असल्याचे सांगत त्यांनी तरुणांच्या या भूमिकेला पाठबळ दिले असून, हा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
९८२२५४८४२९
Views: 45








