पंढरपूरात बकरी ईदची कुर्बानी होणार नाही; एकादशीमुळे मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय.


पंढरपूरात बकरी ईदची कुर्बानी होणार नाही; एकादशीमुळे मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय.

पंढरपूर प्रतिनिधी:  येथे यंदा बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच कालावधीत आल्याने सामाजिक सलोखा आणि धार्मिक भावना जपण्यासाठी मुस्लिम समाजाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात बकरी ईदनिमित्त सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम धर्मीयांनी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

आषाढी एकादशीसाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव निर्माण होऊ नये, तसेच वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी, धर्मगुरू आणि स्थानिक संघटनांनी एकमताने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, पंढरपूरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनानेही दोन्ही सण शांततेत आणि उत्साहात पार पडावेत यासाठी नियोजन सुरू केले आहे.

पत्रकार: शाम शिरसाठ पुणे


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!