आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न


नाशिक : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला “राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६” पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार (दि. २८ मे) रोजी उत्साहात संपन्न झाला.
कॉलेज रोड येथील गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक, शिक्षक, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि नागरिकांची उपस्थिती लाभली. समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
“कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान, गौरवाचा सर्वोच्च मान” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. अनिल गणपत पावसे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
दुपारी १२ ते २ या वेळेत पार पडलेल्या कार्यक्रमात पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव करण्यात आला. समाजातील सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
हा पुरस्कार सोहळा आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली.

पत्रकार उमेश कुलकर्णी


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!