देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडे घेऊन येत आहेत ‘मुळशी पॅटर्न २’
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न २’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नव्या चित्रपटाचे उपशीर्षक “तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट” असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटात सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नांमागील वास्तव, बांधकाम क्षेत्रातील घडामोडी आणि वाळूच्या अवैध व्यवसायाशी संबंधित गंभीर विषय मांडला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘मुळशी पॅटर्न’च्या पहिल्या भागाने ग्रामीण भागातील सामाजिक वास्तव आणि गुन्हेगारीचे चित्रण करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे दुसऱ्या भागाकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
प्रवीण तरडे यांच्या या नव्या प्रकल्पामुळे मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, चित्रपटाच्या कलाकारांबाबत आणि कथानकाबाबत अधिकृत माहितीची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










