समाज मंदिराच्या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्यास नागरिकांचा विरोध; निर्णय मागे घेण्याची मागणी


सांगली:दि. 31 मे:- वार्ड क्रमांक १० मधील समाज मंदिराच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्णयाविरोधात परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्वर्गीय स्थायी समिती सभापती मा. अशोक माने साहेब यांच्या प्रयत्नातून आणि अनेक न्यायालयीन लढ्यांनंतर सर्वसामान्य, गोरगरीब आणि बहुजन समाजासाठी मंजूर झालेले समाज मंदिर आज राजकारणाच्या विळख्यात अडकत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, वार्डात आधीच तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे अस्तित्वात असताना समाज मंदिराच्या जागेवर आणखी एक आरोग्य केंद्र उभारण्यामागे नेमका उद्देश काय? असा सवाल उपस्थित होत आहे. भागातील एका सभापतीसह दोन नगरसेवकांनी स्पष्ट विरोध दर्शवूनही काही विशिष्ट लोकांकडून राजकीय हेतूने समाज मंदिराच्या जागेचे भांडवल केले जात असल्याचा आरोप होत आहे.

महागाईच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांना घरगुती कार्यक्रम, लग्नसोहळे किंवा सामाजिक उपक्रमांसाठी महागडे हॉल परवडत नाहीत. अशा परिस्थितीत बहुजन समाजासाठी मोठा आधार ठरणारे समाज मंदिर हिरावून घेतले जात असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. “हे फक्त इमारतीचे प्रकरण नाही, तर गोरगरिबांच्या हक्काच्या जागेचा प्रश्न आहे,” अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर यांच्याकडे वारंवार निवेदन देत “पूर्वीचे समाजी मंदिर आणि समाज मंदिर पूर्ववत ठेवावे,” अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा बहुजन समाजावर अन्याय होऊन तीव्र असंतोष निर्माण होईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुरज मामा पवार, समाज कल्याण सभापती गीताताई सुरज पवार, सागर माने, नगरसेवक अशोक मासाळे, नगरसेविका वर्षाताई निंबाळकर तसेच भागातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने समाज मंदिर कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे,
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!