मित्रानेच घेतला मित्राचा जीव :-


मित्रानेच घेतला मित्राचा जीव :-



जि.सांगली.ता.कवठेपीराण:दि. 30 मे :-कवठेपीराण येथे दारू पिण्याच्या वादातून मित्रानेच मित्राचा गजाने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सचिन सुभाष पाटील (३५) असे मृत तरुणाचे नाव असून संशयित जगन्नाथ विलास भोसले (४०) याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने काही तासांतच कोल्हापूर जिल्ह्यातून अटक केली.

दोघेही बुधवारी सकाळी एकत्र दारू पित असताना त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या भोसले याने गजाने सचिनच्या डोक्यात वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर संशयिताने घराला कुलूप लावून पलायन केले होते. दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

पत्रकार :विजय रणभोर,पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!