पुणे — भीमाशंकर मंदिर दर्शन १५ जूनपर्यंत बंद; जिल्हा प्रशासनाने भाविकांना आवाहन


पुणे — भीमाशंकर मंदिर दर्शन १५ जूनपर्यंत बंद; जिल्हा प्रशासनाने भाविकांना आवाहन

पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मंदिरातील विकासकामे पूर्ण न झाल्यामुळे आणि दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू करण्यासाठी आणखी कालावधी लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

मंदिर ९ जानेवारीपासूनच बन्द होते. ३१ मे रोजी दर्शनासाठी उघडणार असल्याची अफवा पसरल्यानंतर राज्यभरातून मोठी गर्दी घोडेगावकडे सुरू झाली. तरी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिसांनी घोडेगावजवळ तातडीने बॅरिकेड लावून भाविकांचे आगमन थांबवले.

जिल्हा प्रशासनाने सांगितले की, गाभार्‍यातील व परिसरातील विकासकामे आता पूर्ण करण्यात येत आहेत; परीस्थिती सुरळीत न झाल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांनी १५ जूनपूर्वी भीमाशंकरच्या दर्शनासाठीच्या प्रवासाचे आयोजन टाळावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!